Bookings Open !
दत्तराज नर्सरी ची सुरुवात १९९७ साली दत्तराज नर्सरीचे संस्थापक उमेश येरम यांनी केली. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रासोबत बरीच वर्ष काम करून मिळालेल्या अनुभवातून त्यांनी लहान स्तरावर ह्या नर्सरीला सुरुवात केली. संस्थापक उमेश येरम आणि त्यांची पत्नी उर्मिला येरम यांच्या बऱ्याच वर्षाच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नानंतर दत्तराज नर्सरी हि आज सिंधुदुर्गातील नामांकित नर्सरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. फक्त आंबा आणि काजू झाडांच्या विक्रीपासून सुरु झालेल्या ह्या नर्सेरी मध्ये आज जवळपास शंभर पेक्षाही जास्त प्रकारची झाडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, मसाल्याची झाडे तसेच विविध शोभेच्या झाडांचा समावेश आहे.
ग्राहकांना जास्तीत जास्त उत्पादन देणारी झाडे कशी पुरवता येतील हे दत्तराज नर्सेरीचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. दत्तराज नर्सरी मध्ये तयार होणारी झाडे ही निवडक आणि उत्कृष्ट दर्ज्याच्या मातृवृक्षापासून बनवली जातात त्यामुळे येथे मिळणारी झाडे हि त्याच दर्ज्याची आणि जास्त उत्पन्न देणारी असतात.
बऱ्याच वर्षाच्या अनुभवामुळे दत्तराज नर्सरी मध्ये ग्राहकांना वृक्ष लागवडीचा योग्य सल्ला दिला जातो. झाड कसे लावावे, झाड लावल्या नंतर झाडांची जोपासना कशी करावी, कोणत्या झाडासाठी कोणती खते वापरावीत, कोणत्या रोगांवर कोणती फवारणी करावी ह्याची संपूर्ण माहिती दत्तराज नर्सरी मध्ये दिली जाते.
लोडिंगची कोणतीही चिंता नाही! आम्ही तुमची रोपे अत्यंत काळजीपूर्वक लोड करतो.
दत्तराज नर्सरीपासून घरापर्यंत ! आम्ही झाडे पोहोचवू आनंदाने.
तुमच्या रोपांची भरभराट व्हावी यासाठी संपूर्ण मार्गदर्शन.
दत्तराज नर्सरी, वेंगुर्ला कॅम्प, वेंगुर्ला हायस्कूल जवळ, तालुका- वेंगुर्ला, जिल्हा-सिंधुदुर्ग, पिन कोड-४१६५१६, महाराष्ट्र